पान:प्रमाणशास्त्र.pdf/225

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२१६
खासगी लेख

" स्वाधीन केला तो मनुष्य प्रतिपक्ष्यास दाखवून दि-"ल्यावांचून, त्या कारणांवरून त्या दस्तऐवजाचा मजकुराविषयीं तोंडचा पुराव्यास त्याचानें हरकत " घेववत नाही; किंवा जा नोटिशीत तो दस्तऐवज " हजर करण्याविषयी त्याजला हुकूम झाला असेल, " अशा नोटिशीनंतर आपल्या खुशीने अशा दस्तऐवजाचा तो वियोग करील, तर त्या नोटिशीचा " परिणामांतून तो सुटूं शकत नाही. ज्या पक्षकारास कांहीं दस्तऐवज हजर करण्याविषयी नोटीस झाली असेल, आणि त्याचा हातांत ते दस्तऐवज होते असे पाहिल्याचा पुरावा असेल, तर ते त्याचा कबजांतून बाहेर गेल्याचा थांग लावून देणे हे त्याचे काम आहे.

 ३९८. जा पक्षकारास नोटीस दिली असेल त्याचा प्रत्यक्ष कबजांत तो दस्तऐवज असला पाहिजे, हैं अवश्य नाहीं; त्याचा त्यावर अधिकार असल्यास किंवा तो दस्तऐवज केवळ पाहण्या पुरता हक्क नसून तो दस्तऐवज बाळगिण्याचा हक्क असल्यास, बस आहे; आणि तो त्याचा चाकराचा किंवा मुखत्याराचा कबजांत असला तर त्या खुद पक्षकारावर नोटीस दिल्यास बस होईल.

 ३९९. चौकशी समयी तो दस्तऐवज हजर करण्याजोगा अवकाश ठेवून त्या पक्षकारास नोटीस.लाविली पाहिजे. त्या नोटिशीत काय काय बिना असली पाहिजे याविषयी टेलर याणे व्याख्यान केले