पान:प्रमाणशास्त्र.pdf/224

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

215

परावा घेण्याचा आपला अधिकार अमलांत आणण्यास कोर्ट प्रवृत्त होणार नाही..

 ३९६. तिसरा प्रकार भिंतीवरील, किंवा झाडावरील, किंवा थड्यावरील खोदलेले लेख इत्यादिक प्रकारचे दस्तऐवज, हे असल हजर करणे अशक्य नाही, तरी फार दुर्घट होय, म्हणून अशा ठिकाणी गौण पुरावा घेण्यांत येतो. तसेंच ( या ग्रंथाचें कलम ३५० यांत ) लिहिले आहे, की सरकारी दफ्तरें पुराव्यास हजर करणे ही विशेष जोखमाची वगैरेसोयी ची गोष्ट आहे, सबब अशा लेखांची शाबिती साधारणतः तोंडचा साक्षीने होत नाही, तथापि सहीने खन्या केलेल्या किंवा तपासलेल्या नकलांनी होते.

 ३९७. चौथा प्रकार असल दस्तऐवज प्रतिपक्ष्याचा कबजांत असून, व त्याजला तो हजर करण्याविषयी नोटीस लागू झाली असता तो त्याणे हजर केला नसल्यास, त्याबदल गौण पुरावा कबूल करण्यांत येतो. ही गोष्ट दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांस एकसारिखी लागू पडत्ये. परंत तो दस्तऐवज प्रतिपक्ष्याचा कबजांत किंवा स्वाधीन आहे, असा भरवसा पटण्यास कारण असले पाहिजे; आणि, " एकादा अमुक दस्तऐवज पक्षकाराचा कबजांत आहे, असा थांग लागला असून त्याला तो "हजर करण्याविषयी नोटीस झाली असतां, त्या नोटीशीपूर्वी त्यावरील आपला कबजा नाहीसा झाला, ही गोष्ट त्याणे विरुद्ध पक्षकारास कळविली "असल्यावांचून, आणि तो दस्तऐवज आपण जाचा