पान:प्रमाणशास्त्र.pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२१४
खासगी लेख

शाबिती त्या पक्षकाराने केली पाहिजे, आणि तो दस्तऐवज जा ठिकाणी फारकरून सांपडावया सारिखा होता, ती ठिकाणे त्या पक्षकाराने शोधून पाहिली असे शाबीत करून, तो दस्तऐवज हरवला गेला हे दाखविण्याचा अखत्यार आहे. तो शोध नूतन असला पाहिजे, किंवा मुकदम्याचा कारणास्तव केलेला असला पाहिजे, असें जरूर नाही.

 ३९४. एकाद्या अमुक मनुष्याचा स्वाधीन किंवा कबजांत तो दस्तऐवज आहे, असे मानण्यास कारण असल्यास तो दस्तऐवज हजर करण्याविषयी समान किंवा नोटीस त्या मनुष्यावर लागू करावी, आणि तो मनुष्य तो दस्तऐवज हजर न करील, तर त्या दस्तऐवजाचे काय झाले याविषयी त्याची जबानी घ्यावी.

 ३९५. दुसरा प्रकार:-सन १८५५ चा आक्ट २ कलम ३६, यांत असें ठरविले आहे, की "कोणत्याही "दिवाणी मुकदम्यामध्ये, किंवा खटल्यामध्ये, एकादा "असल दस्तऐवज कोर्टाचा 'प्रासेसीस बेलाग असेल, "तेव्हां, कोर्टास दरखास्त दिली असेल, आणि सुनावणी पूर्वी योग्य वेळांत विरुद्ध पक्षकारास सूचना "दिली असेल, तर तो दस्तऐवज झाल्याविषयी, आणि त्यांतील मजकूराविषयीं गौण पुरावा घेण्याचा "हकम करण्यास कोटास अधिकार आहे; परंतु तो दस्तऐवज कोर्टाचा हुकमतीस खरोखर बेलाग आहे, असे स्पष्टपणे शाबीत झाले पाहिजे; आणि असल दस्तऐवज हजर करवितां येत असल्यास, तो गौण