पान:प्रमाणशास्त्र.pdf/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२१३

केला गेला. सन १८५५ चा २ च्या आक्टा, कलम ३४ यांत त्या सारिखाच नियम आहे. तो असाः" या खटल्याचा बाबतीप्रकरणी साक्षीदाराने जबानी " पूर्वी स्वतः लिहून दिली असेल, किंवा त्याची जबानी पूर्वी लिहून घेतली असेल, ती त्यास न दाखवितां, तिजविषयी त्यास उलटपालट प्रश्न करण्याचा अधिकार आहे; परंतु त्या लेखावरून त्या साक्षीदाराचा बोलण्याचे खण्डन करण्याचा इरादा असेल, तर खण्डन करण्याचा पुरावा देण्यापूर्वी त्याचे " खण्डन करण्याकरितां त्या लेखाचा जा भागांचा उपयोग करावयाचा असेल, ते भाग लक्षात ठेवण्याविषयी त्यास सांगितले पाहिजे. असे ठराविले आहे, की इनसाफ होत असतां कोणत्याही वेळी आपणास पाहण्याकरितां तो लेख हजर करण्यास सांगण्याचा अधिकार जज्जास आहे; मग इनसाफाचा कामांत आपणास योग्य वाटेल त्या प्रमाणे त्या लेखाचा उपयोग करण्याचा अधिकार त्यास आहे." ( या ग्रंथाचे कलम २८० पहा).

 ३९३. एकाद्या लेखी दस्तऐवजाविषयी गौण पुरावा जा निरनिराळ्या बाबतीत घेण्याचा अखत्यार आहे याविषयी आपण आतां विचार करूं. प्रथमतः, एकादा दस्तऐवज नष्ट झाला, किंवा हरवला, आणि ती गोष्ट प्रतिपक्षकार कबूल करीत नाही, (अशा कज्जांत गौण परावा कबूल होण्या पूर्वी,) असा दस्तऐवज खरोखर अस्तित्वांत होता, आणि तो नष्ट झाला आहे, किंवा ठाकून दिला गेला आहे, किंवा हरवला आहे, अशी