पान:प्रमाणशास्त्र.pdf/221

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२१२
खासगी लेस

इतर पुरावा देणें तो 'गौण' होय; आणि कोणत्या. ही दस्तऐवजास अस्तित्व असतां, व तो हजर करण्याचे पक्षकारास सामर्थ्य असता, त्यांतील मजकुराविषयीं गौण पुरावा घेता येत नाही, असा साधारण नियम आहे. याप्रमाणे, एका प्रिन्सिपाल सदर अमिनाने असल दस्तऐवज हजर करण्याविषयी हुकूम केल्यावांचून त्यांचा नकला पुराव्यांत घेतल्या, म्हणून तो कज्जा कलकत्याचा सदर दिवाणी अदालतीने सन १८५३ सालचा नंबर १८८ चा अर्जावरून परत चौकशीस पाठविला.

 ३९२. सदरील नियमावरून असे सिद्ध होते, की एकाद्या साक्षीदारास प्रतिप्रश्न होत असतां दस्तऐवज हजर करून त्याजला दाखविल्यावांचून त्या लेखी दस्तऐवजाचा मजकुराविषयी त्याजला विचारितां येत नाही; परंतु जेव्हां तो दस्तऐवज कोणी साक्षीदाराने स्वतः लिहिलेला असून, आणि जेव्हां प्रतिप्रश्न करीत असतां त्यांतील मजकूर विचारून त्याची परीक्षा पाहणे असे, तेव्हां वरील नियमापासून फार अडचण होई; कारण तो दस्तऐवज पूर्वी साक्षीस दाखविल्याने सदरील हेतु अगदी फुकट जाई. आणखी जेथें तो दस्तऐवजच शाबीत करण्याचा हेतु नमून व्यावरून त्या साक्षीदाराचा आठवणीची किंवा खरेपणाची पारख मात्र कर्तव्य आहे तेव्हां तो नियम लागू करितां येईल की नाही, याविषयी संशय होता. नंतर पुष्कळ वादविवादांती, सन १८५४ सालचा इंग्लिश कामन्ला वहिवाटीचा आक्टावरून तो नियम ढील