पान:प्रमाणशास्त्र.pdf/220

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२११

जो दस्तऐवज असेल तो, जर त्यास तो दस्तऐवज देण्याकरितां हजर होण्याचे समान झाले असते, तर त्याला हुकूम करण्याचा जसा कोर्गस अखत्यार असता, तसा व त्याच प्रमाणे, हजर करविण्याचा अखत्यार आहे ( या ग्रंथाचे कलम २४५ पहा ).

 ३९०. एकादा दस्तऐवज हजर करण्याविषयी समान किंवा हुकूम अमान्य केल्यापासून होणाऱ्या परिणामांचा विचार, साक्षीदारास समान करविण्याविषयींचा व्याख्यानप्रकरणांत, झालेला आहे. (या ग्रंथाचे कलम २४० पहा).

 ३९१. कज्जांत जो अत्युत्कृष्ट पुरावा असेल तो दाखल केला पाहिजे, या मुख्य नियमाचे व्याख्यान करीत असतां आपण १३२ व्या कलमांत असे लिहिले आहे, की "ज्या पुराव्याची बळकटी दाबून ठेविलेल्या पुराव्यापासून प्राप्त होत्ये, असें जो पुरावा "पाहतांच दिसून येते, तो पुरावा घेतला जाणार नाही. " असा त्या नियमाचा अर्थ बेस्ट याणे केला आहे. आता एकाद्या लेखी दस्तऐवजाचा मजकुराविषयी उत्कृष्ट पुरावा हा तो दस्तऐवजच हजर करणे हा होय. कारण त्यांतील मजकुराविषयी एकादा इतर पुरावा तोंडी किवा त्या दस्तऐवजाचा नकलेवरून असतो, तो त्या मूळ दस्तऐवजापासूनच निघालेला असतो, आणि त्यापेक्षा चांगली साक्ष म्हणजे तो स्वतः दस्तऐवज झालेला आहे असे तो पुरावाच दर्शवितो; यास्तव तो दस्तऐवज, हाच त्यांतील मजकुराविषयी प्रधान' पुरावा होय, आणि त्याविषयी