पान:प्रमाणशास्त्र.pdf/219

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२१०
खासगी लेख.

"दाव्याचा पहिल्या चौकशीस आपणाबराबर आणून कोर्ट हुकूम करील त्या वेळेस हजर करण्यासाठी "हजर ठेविले पाहिजेत. आणि पहिल्या चौकशीचा "नंतर सर्व पक्षकार, अगर त्यांपैकी कोणी पक्षकार, "कोणत्याही प्रकारचा पुराव्याचे कागद पत्र हजर "करूं इच्छील, तर पहिल्या चौकशीस ते हजर न केल्याचे योग्य कारण दाखवून कोर्टाची खातरी केल्याशिवाय ते कोर्टाने घेऊ नये."

 ३८८. एकादा दस्तऐवज हजर करण्याविषयी साक्षीदार याजवर बजविण्याकरितां समान मागण्याची रीति व त्याविषयी वहिवाट या आक्टाचा १४९ व्या व त्या पुढील कलमांत सांगितलेली आहे. त्या दस्तऐवजाचा स्वरूपाविषयींचे वर्णन संशय नपडे असें त्या समानांत लिहिले पाहिजे; आणि "केवळ दस्तऐवज हजर करण्याविषयी जा मनुष्यास समान झाले असेल त्या मनुष्याने दस्तऐवज हजर करण्याकरितां खुद हजर न होतां तो दस्तऐवज हजर करविला तर समानांत लिहिल्याप्रमाणे त्याणे केले असे "समजावें."

 ३८९. त्याच आक्टाचे कलम १६६ अन्वयें मुकदम्यांतील एकाद्या पक्षकारास त्याचा हाती अगर ताब्यात असलेला एकादा दस्तऐवज आणण्याविषयी कोर्टास स्वमताने समान करण्याचा अखत्यार आहे; आणि कलम १७१ या अन्वये कोर्टात हजर असलेल्या कोणत्याही मनुष्यापाशी, तो पक्षकार असो किंवा नसो, तेथे त्या वेळेस प्रत्यक्ष अगर त्याचा ताब्यांत