पान:प्रमाणशास्त्र.pdf/218

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खासगी लेख.

२०९

 ३८५. सदरहु आक्टाचे कलम ४० अन्वये "प्रतिवादीचाजवळ किंवा त्याचा ताब्यांत एकादा "दस्तऐवज आहे तो आणविण्याची वादीला गरज असेल, तर फिर्यादअर्ज देते वेळी त्या दस्तऐवजाचा बयान लिहून देण्याचा अखत्यार वादीस आहे." आणि प्रतिवादी याजला कलम ४३ अन्वयें समान करितानां तो दस्तऐवज आणि जाचा आधारावर मतिवादी आपला जबाब देणार असा दस्तऐवज असेल तर तो हजर करण्याचा हुकूम कोर्ट करील.

 ३८६. कलम १०७ अन्वये, मुकदम्यांतील एकाद्या पक्षकाराने एकादा दस्तऐवज, किंवा लेख, किंवा इतर वस्तु त्याचा हाती किंवा ताब्यांत असेल, ती हजर करावी, अशी जा दुसऱ्या पक्षकाराची इच्छा असेल, त्याणे त्याचा प्रतिपक्ष्याने सदरील लेख वगैरे हजर करण्याविषयी, त्या पक्षकाराचा नावाचा दोन नोटिशी लिहून कोडताचा स्वाधीन कराव्या; त्यांपैकी एक नोटीस कोर्सत दाखल झाली पाहिजे, आणि दुसरी नोटीस योग्य अधिकाऱ्याने त्या पक्षकारावर किंवा त्याचा वकिलावर बजाविली पाहिजे:

 ३८७. कलम १२८ अन्वयें "पक्षकारांचा हरएक पुराव्याचे कागद पत्र जे अगोदर कोर्टात दाखल "झाले नसतील ते, आणि दाव्याचा चौकशीचा अगोदर वाजवी मुदतीचा आंत जा कोणा पक्षकारावर "नोटिशी बजाविल्या असतील, त्यांत सांगितलेले पुराव्याचे दस्तऐवज व कागदपत्र, अगर दुसरे जिन्नस असतील ते पक्षकारांनी अगर त्यांचा वकिलांनी