पान:प्रमाणशास्त्र.pdf/217

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२०८
खासगी लेख.

 ३८३. आरंभीचा चौकशीत पोलिसासमोर झालेले साक्षीदाराचे इकरार लेखी असले तर त्यांवर इकरार देणाराचा सहीची जरूर नाही, आणि " त्यांचा पुराव्यांत उपयोग केला जाणार नाही व ते कज्जातील दफ्तरांत दाखलही होणार नाहीत.” (सन १८६१ चा आक्ट २५ कलम १४५). जाबजबाबांतील कबूलपणापासून काय परिणाम होतात ते पूर्वी सांगण्यांत आले आहे. (या ग्रंथाचे कलम १५५ व १५७ पहा. )


खासगी लेख हजर करण्याविषयी व
त्यांची शाबिती करण्याविषयी.

 ३८४. सन १८५९ चा ८ व्या आक्टाचा ३९ व्या कलमावरून, फिर्यादी समयीं ज्या एकाद्या लेखी दस्तऐवजावर वादीचा आधार असेल, तो दस्तऐवज त्याचा नकलेसहित (किंवा जर दस्तऐवज वही असेल तर जा रक्कमेवर त्याचा आधार असेल त्या रकमेचा नकलेसहित ) वादी याणे फिर्याद देते समयों हजर केला पाहिजे. तो नकल कज्जांत दाखल करून तो असल दस्तऐवज बहुधा परत देतात; परंतु वादीची खुशी असल्यास असल दस्तऐवज दाखल करावा. "फिर्याद अर्जीबरोबर वादीने हजर केला नाही असा दस्तऐवज असेल, तो पहें चौकशीचा वेळेस "कोर्टाचा विचारास न येईल तर वादीतरफे साधन "म्हणून घेतला जाणार नाही."