पान:प्रमाणशास्त्र.pdf/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जबान्या व पुरशिसा

२०७

किंवा अंगीकाराचे मजकूर अशा स्वरूपाने ग्राह्य हो. तील; परंतु साक्षीदारांवर सक्ती करून जो जबाब घेतला असेल, तो फौजदारी प्रकरणांत त्याचा विरुद्ध अंगीकाराचा मजकूरा प्रमाणे घेऊ नये, असे सन १८५५ चा २ या आक्याचा ३२ व्या कलमांत ठरविले आहे. (या ग्रंथाचे कलम १६८ व १७५ पहा).

 ३८१. आणखी वंशावळी, किंवा चाली, किंवा भोगवटे, यांचा बाबतीसंबंधी, वादाचा प्रारंभ होण्या पूर्वी जा जबान्या दिल्या असतील, आणि ते जबानी देणारे पढ़ें मरण पावले असतील, तर त्या जबान्या तिऱ्हाईत मनुष्याचाही विरुद्ध लौकिकाविषयी साक्ष म्हणून कबूल केल्या जातील. (या ग्रंथाची कलमें १९२, १९७ व २०३ पहा).

 ३८२. ज्या जबान्या व पुरशिसा फौजदारी खटल्यांत माजिश्रेस्टापुढे घेण्यांत येतात, त्या जबान्यांचा व पुरशिसांचा नेहमी पुराव्यांत उपयोग केला जातो. पुढे कैदीचा चौकशीचा समयीं जरूर पडल्यास यांची शाबिती माजिस्त्रेयचा किंवा त्याचा कारकुनाचा साक्षीने करितां येईल. परंतु (कलम १७५ व ३७५ पहा,) कैदीने माजि स्त्रेठापुढे सांगितलेला मजकूर, तो आपखुशीने सांगितलेला असल्यास, त्याचा विरुद्ध त्याचा कबलपणा प्रमाणे उपयोगांत आणिला जातो; म्हणन तो जे शब्द बोलला असेल, त्याच शब्दांनी तो लक्षपूर्वक लिहून ठेवावा ही गोष्ट अतिशय जरूरीची आहे. (या ग्रंथाचे कलम १७४. ) अंगीकाराचा मजकूराचा बाबतीत या ग्रंथाचे कलम १६६ पहा.