पान:प्रमाणशास्त्र.pdf/215

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२०६
जबान्या व पुरशिता.

देत्ये वेळी आणि ती जबानी जोपावेतों होत असेल त्या सर्व वेळी तो आरोपित मनुष्य हजर असला पाहिजे; ती जबानी जा वेळी झाली त्या वेळी जा गोष्टीचा वाद पडला असेल तिचा संबंधी असून, तिचाच साम्प्रत वाद पडला असला पाहिजे; कारण, जर ती बाबत अर्थतः निराळी असेल तर ती जबानी अग्राह्य होईल. (सन १८६१ चा आक्ट २५ कलम ३६९, व या ग्रंथाचे कलम २३७ पहा ).

 शेवटी असे सांगणे आहे, की ते प्रकरण त्याच पक्षकारांचा दरम्यान, किंवा यांचा हक्काने जे वाद सांगत असतील त्यांचा दरम्यान असले पाहिजे; कारण, जा तिन्हाईत मनुष्यास प्रतिप्रश्न करण्याची सवड नव्हती त्याचा विरुद्ध एकाद्या जबानीचा उपयोग करूं नये, हा जसा नियम आहे, तसा ज्या पुराव्याचा उपयोग तिऱ्हाईत मनुष्याचा विरुद्ध करितां येत नाही, त्या पुराव्याचा फायदाही त्या तिऱ्हाईतास इतास घेतां येणार नाही. फौजदारी कजांत अशा प्रसंगी अशा जबान्यांचा ग्राह्यतेविषयीं या ग्रंथाचे कलम १३८ व २३६ यांत पूर्वीच लिहिले आहे.

 ३७९. कलम २८४ यांत सांगितल्या अन्वयें साक्षीदाराचा साक्षीचे प्रत्यंतर पाहण्यास, किंवा तो जो मजकूर साम्मत सांगत आहे त्याहून पूर्वी भिन्न मजकूर त्याणे सांगितला होता, असें शाबीत करण्यासही जबानीचा उपयोग करितां येतो. (या ग्रंथाचे कलम २७७ व २७८ पहा).

 ३८०. जबान्या, आणि पुरशिसा या, कबुलाती