पान:प्रमाणशास्त्र.pdf/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जबान्या व पुरशिसा.

२०५

किंवा जा ठिकाणी कोडत असेल त्या ठिकाणाहून, संगनमताची बाबद खेरीज करून, १०० मैलांहून अधिक अंतरावर असल्यामुळे एकाद्या साक्षीदारास दिवाणी मुकदम्यांत आणता येत नसल्यास, सन १८५९ चा आक्ट ८ कलम १७५ अन्वयें कमिशन् पाठवून त्याची साक्ष घेण्याचा अखत्यार आहे. आणि तें कमिशन योग्य रीतीने अमलांत आणल्या. बदल शेरा लिहून आल्यावर कलम १७९ अन्वये अशा जबान्या ग्राह्य आहेत असें ठरविले आहे.

 ३७८. साक्षीदार मैयत असल्यास, किंवा त्याजला हजर करणे, हे पक्षकाराचा, किंवा फौजदारी कज्जांत , कोडताचा हातांत नसल्यास, जा एकाद्या पूर्वीचा न्यायसंबंधी प्रकरणांत प्रतिपक्षकाराने जबानी देणारास मतिप्रश्न करण्याची सवड असून त्या जबानी देणाराने शपथेवर किंवा सत्यप्रतिज्ञेवर लिहुन दिलेली जबानी त्याच पक्षकारांचा दरम्यान किंवा त्यांचा हक्काने जे दावा सांगत असतील त्यांचा दरम्यान दोन्हीही खटल्यांत एकच मुद्दा असेल, तर कबूल केली जाईल. परंतु ती न्यायसंबंधी प्रकरण चालत असतां शपथेवर किंवा सत्यप्रतिज्ञेवर झाली असली पाहिजे, हे लक्षात ठेवावे. आणि त्या कज्जांतील निवाड्याची नकल हजर करून ती जबानी या रीतीने घेतली होती हे शाबीत करता येईल; आणि प्रतिप्रश्न करण्याची सवड असली पाहिजे, आणि फौजदारी कजांत साक्षीदारांस मानिस्त्रेगसमूर शपथ