पान:प्रमाणशास्त्र.pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२०४
जवान्या आणि पुरशिक्षा.

त्या अंशाची शाबिती करण्याची परवानगी कोटास देता येईल.

 ३७६. जबानी देणार जीवंत असेल व त्याजला हजर करितां येत असेल, तर चौकशीचा पूर्वी घेतलेली जबानी पुरावा म्हणून मानली जात नाही, असा साधारण नियम आहे. परंतु ( या ग्रंथाचे कलम २३६ पहा,) मतु आणि परूमल, यांचा कज्जांत मद्रास एथील फौजदारी अदालतीने असा लेख लिहिला आहे, की " एकाद्या कैदीचा चौकशीचा " समयीं जो पुरावा हजर करितां येईल, त्याखेरीज करून दुसऱ्या कोणत्याही पुराव्यावरून त्याजला कोणत्याही रीतीने बाध लागत नाही, " असाही नियम आहे. सरकिट कोर्टाचा तिसऱ्या "'जज्जाने एका दुसऱ्या कन्नांतील पाठविलेल्या चौकशी होण्याचा पूर्वीचा म्हणजे खटल्याचा आरंभीचा जाबजबाबांचा कागदपत्रावरून कोणत्या" ही रीतीने या चौकशीतील पुराव्याची न्यूनता "पुरी होत नाही. किंवा ते प्रकरण या कजांत माजिश्रेटाने किंवा जाइंट क्रिमिनल जज्जाने तयार " केलेले असते तथापि त्या प्रकरणाचा उपयोग या "खटल्यांत झाला नसता." यास्तव कोर्टाने आणखी परावा घेण्याविषयी हुकूम केला.

 ३७७. एकादा साक्षीदार अल्पकालिक आजाराने दुखणेकरी असल्यास, तो बरा होई पर्यंत चौकशी तकूब ठेवावी; परंतु नेहमीचा दुखण्याचा कारणानें, क्षीणपणामुळे, बायकोची जात असल्यामुळे,