पान:प्रमाणशास्त्र.pdf/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जबान्या आणि पुरशिसा.

२०३

असे दाखवून हमेशा त्याचे निवारण करितां येते. फौजदारी निवाड्याचा अर्थ कसा करावा याविषयी खाली लिहिलेला नियम पीनलू कोडाचा ७२ व्या कलमांत सांगितला आहे; तो असा, की " ठरावांत " लिहिलेल्या अनेक अपराधांपैकी एक अपराध केल्याचा गुन्हा अपराध्यावर लागू झाला; परंतु तो " अपराध कोणता याचा संशय आहे, असा ठराव " झाला, तर अशा प्रकारचा सर्व मुकदम्यांत, त्या "सर्व अपराध्यांस शिक्षा सारिखी नेमिली नसल्यास, "ज्या अपराधाबदल सर्वांहून कमी शिक्षा नेमिली " असेल त्या अपराधाबदलची शिक्षा त्या अपराध्यास दिली पाहिजे."


जबान्या आणि पुरशिसा.

 ३७५. या ग्रंथाचे कलम ३४९ यांत आपण सांगितले आहे, की जा जबान्या किंवा पुरशिसा काय. द्यावरून लेखी असल्या पाहिजेत त्यांचा मोबदला तोंडची साक्ष देतां येत नाही; आणि साधारण नियम असा आहे, की दफ्तरांत लिहून ठेविले असेल त्याहन एकादी निराळी किंवा एकादी अधिक गोष्ट त्या वेळी जबानी देणार याणे सांगितली, असें शाबीत करण्यास्तव तोंडची साक्ष मान्य करूं नये. परंतु एकाद्या कज्जांत एकाद्या जबानीचा किंवा पुरशिशीचा कांही अंश मुळींच लिहून घेतला नाही, अशी स्पष्टपणे शाबिती होईल, तर कदाचित तोंडचा साक्षीने