पान:प्रमाणशास्त्र.pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२०२
न्यायसंबंधी लेख

गुणदोषांवरून फिर्याद आणण्याचा त्याजला अधिकार आहे, आणि तशी फिर्याद झाली असल्यास तो परमुलकी निवाडा हजर केला असला तथापि त्या दाव्याविषयी हरकत प्रतिवादी याजला सांगतां येईल, किंवा त्या वादीला त्याच निवाड्यावरून फिर्याद आणण्याचा अधिकार आहे.

 परमुलकी निवाडा सिलोन एथील कोडतांत झालेला असला तरीही त्याजवरून नवीन फिर्याद आणल्यावांचून आपली दिवाणी कोर्ट तो निवाडा अमलांत आणणार नाहीत; परंतु गव्हर्नर जनरल यांणी परराज्यांत स्थापलेल्या कोर्टाचा निवाड्यांस हा नियम लागू होत नाही.

 ३७३. अति वरिष्ठ कोर्यचा निवाडा, कपट किंवा संगनमताने झालेला आहे अशा कारणावरून रद्द होईल. एकाद्या तिन्हाईत मनुष्याविरुद्ध साक्षीत निवाडा देण्यास आणला असल्यास, तो कपटाने व तर्कटाने मिळविलेला आहे, असे दाखविण्याचा त्या. जला हमेशा अखत्यार आहे. निवाड्यांतील पक्षकारास कपट असल्याविषयी शाबिती करण्याचा अख. प्यार आहे किंवा कसे, याविषयी ठराव झाला नाहीं; परंतु ते कपट त्याचे स्वतांचे असल्यास अर्थातच न्याजला तो अधिकार नाही हे निःसंशय आहे.

 ३७४. आणखी असे आहे, की जा कोर्टाने एकादा निवाडा केला असेल, त्या कोर्टास त्या बाबतीत तसा निवाडा करण्याचा अधिकार नव्हता, असें शाबीत करून, किंवा तो निवाडा फिरविलेला आहे,