पान:प्रमाणशास्त्र.pdf/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेख.

२०१

किंवा दिवाळ्यासंबंधी, किंवा मृत्युपत्राचा खरेपणावरून वहिवाटीचा अधिकारपत्रासंबंधी असतात, ते त्या परमुलकांत जी कृत्ये झालेली असतात, तेवढ्यांसंबंधी मात्र निश्चायक असतात, बाकीविषयीं नसतात.

 ३७१ एकाद्या पक्षकारास परमुलकी कोटीत त्याचा वतीने निवाडा मिळाला असून, त्याच फिर्यादीचा कारणावरून त्याच प्रतिवादीवर त्याणे या मलकांत नवा दावा केला असतां, तो परमुलकी निवाडा अमलांत आणलेला असल्यास वादीविरुद्ध निश्यायक होईल; तसेंच, तो अमलांत आणला नसल्यास प्रतिवादी याजला त्या परमुलकी निवाड्यावरून तक्रार सांगून आपले हित करून घेता येणार नाही असे दिसते. परंतु तो परमुलकी निवाडा प्रतिवादीचा वतीने झालेला असल्यास, त्याच वादीने त्याच फियादीचा कारणावरून या मुलकांत त्याच प्रतिवादीवर आणलेल्या दुसऱ्या फियादीत प्रतिवादी याजला तकरार करण्याकरितां तो उपयोगी पडेल. परमुलकांतील एजाद्या लायक हुकुमतीचा कोर्टाने एकाद्या मनुष्याची औकशी करून त्याजला दोषमुक्त केले असल्यास, याच अपराधाकरितां या मुलकांत त्याजवर आणल्या आरोपांत परमुलकी कोटीत झालेल्या दोषमुक्तीची शाबिती करून तिजवरून तकरार करण्याचा अधिकार न्या मनुष्यास आहे.

 ३७२. एकाद्या वादीस त्याचा वतीने परमुलकी निवाडा मिळालेला असल्यास या मुलकांत कन्नाचा