पान:प्रमाणशास्त्र.pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२००
न्यायसंबंधी लेख.

 ३६९. मुकदम्यांतील गुणदोषांवरून शाबीत झालेल्या बाबती कायम ठेवून, निवाडा रद्द झाला होता, किंवा ज्या न्यायाधीशाने तो केला त्याचे त्या कज्जांत स्वहित होते, इत्यादि इतर पुष्कळ हरकती कबूल करितां येतील; आणि टेलर याचा खाली लिहिलेल्या लेखावरून असे दिसते, की इंग्लंडांत अशा निवाड्यांतील प्रतिवादीला पुष्कळ मोकळीक दिलेली आहे. "परमुलकी निवाडा हा देशोदेशींचा कायद्याविरुद्ध " आहे, किंवा स्वाभाविक न्यायाविरुद्ध, किंवा इंग्लिश कायद्याचा अर्थप्रमादावरून झालेला आहे, "किंवा जा मलकांत तो निवाडा झाला त्या मुलकाचा उघड कायद्याविरुद्ध झालेला आहे, किंवा त्यात कोणत्या मुद्याचा निर्णय केला याविषयी संशय "पडण्यासारिखा व्यंग झाला आहे, किंवा तो उघड " रीतीने चुकीचा आहे, म्हणजे तो अमुक कारणावरून केलेला असल्याविषयी त्यांत लिहिलेले अमून त्या कारणावरून निवाडा देण्यास स्पष्टपणे आधार होत नाही, इत्यादि प्रकार त्या कज्जांतील "कागदपत्रावरून किंवा इतर बाह्य पुराव्यावरून उघड होत असल्यास, तो निवाडा पुराव्यांत देण्यास सर्वस्वी निरुपयोगी होतो."

 ३७०. विवक्षित विषयावस्थेविषयी झालेल्या परमुलकी निवाड्यांविषयी असे दिसते, की जे युद्धसंपादित धनाविषयी, किंवा परमुलकांत राहिलेल्या मनुध्यांचा तेथे झालेल्या लग्नांसंबंधी असतात, ते सर्व जगाचा विरुद्ध निश्यायक होत; परंतु जे रक्षकपणासंबंधी,