पान:प्रमाणशास्त्र.pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१९८
न्यायसंबंधी लेख

निश्चयक असतात, असे आपण लिहिले आहे. जा सर्वांची नावे वादीप्रतिवादी म्हणून दफ्तरांत दाखल केली असतील, त्या सर्वांचा समावेश पक्षकार या शब्दांत होतो, त्यांत कोणी कज्जाचा वेळी अज्ञान असला तरीही चिंता नाही. परंतु एकाद्या मनुष्यास, त्यास प्रतिवादी केले, हे माहीत नसून, आणि कायद्यांत उक्त रीतीने त्याजला समान लागू केले नसून प्रतिवादी केले असल्यास, तो त्या निवाड्याने बद्ध होत नाही. आणि एकाद्या मनुष्याने एका नात्याने फिर्याद केल्यावरून त्याचा विरुद्ध झालेला निवाडा, त्याजला त्या निवाड्यानंतर दुसऱ्या व निराळ्या कारणावरून फिर्याद करण्यास प्रतिबंधक होणार नाही. कारण, कायद्याचा दृष्टीने तो त्या वेळी अगदी भिन्न मनुष्य होय.

 ३६७. एकाद्या निवाड्यावरून एकाद्या पक्षकारास तक्रार सांगण्याची बंद करण्याचा इरादा असल्यास, तो निवाडा प्रतिबंधा प्रमाणे आहे, अशी तक्रार करण्याची सवड असल्यास ती कज्जांतील कागदांत लिहिली पाहिजे; आणि अशी सवड गेली असतां जो पक्षकार तसे करण्यास चुकला असेल, त्याने त्या प्रतिबंधाविषयी आपला हक्क सोडून दिला, असें समजले जाईल; आणि तो निवाडा पुराव्यांत हजर केल्यास तो फकत घेतला जाईल, परंतु निश्यायक होणार नाही. परंतु जर पूर्वीचा निवाड्याविषयी कज्जांत तक्रार करण्याची सवड नसली, तर तो त्याच पक्षकारांचा दरम्यान, किंवा त्यांचा संबंधाने जे हक्क