पान:प्रमाणशास्त्र.pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेखे.

१९७

नसते, म्हणून फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांत पक्षकार अगदी भिन्न असतात, ही गोष्ट आणखी लक्षांत ठेविली पाहिजे. यास्तव,मनी मोहान् मण्डल,विरुद्ध मधुसूदन मण्डल, यांचा कज्जात , मिस्तर जस्तिस् हाकिन्स् हजर असतां एका गतिवादीने दुसऱ्या वर खोटा आरोप आणिल्याबदल माजिस्टानें त्या प्रतिवादीवर दंडाची ठराव केला होता, हा, या खोट्या आरोपाकरितां नुकसानी घेण्यांचा वादीने ( मुळ फौजदारी खटल्यांतील प्रतिवादीने ) दावा केला, त्यांत त्याचा तरफेनें मजबूद पुरावा आहे, म्हणून कलकत्त्याचा सदर दिवाणी अदालतीने ठराव केला होता, त्यांत चूकी झाली आहे असे दिसते. आणखीही त्याच कारणास्तव दिवाणी मुकदम्यांतील निवाडा फौजदारी खटल्यांत पुरावा होत नाही; त्या दोन्ही खटल्यांत पक्षकारांचा भेद असून अन्योन्यभाव नसतो, आणि एकाद्या पक्षकाराचा चुकीमुळे किंवा वगळणुकीमुळे तो दिवाणी मुकदम्यांत हरला असेल, तर अशा कारणावरून फौजदारी कज्जाचा चौकशीत लोकांचे नुकसान व्हावें द्वा अन्याय होईल. विवक्षित विषयावस्थेविषयी आलेला निवाडा फौजदारी चौकशीत पुरावा म्हणून बाह्य होईल किंवा कसे याविषयी संशय आहे.

 १६६. जे निवाडे विवक्षित विषयावस्थेविषयी झालेले नव्हत, त्यांस पक्षकारां दरम्यानचे निवाडे, असे म्हणतात. (या ग्रंथाचे कलम ३६० यांत) असे निवाडे पक्षकारांविरुद्ध किंवा त्या पक्षकारावरून जांस हक्क पोचत आहे असा दावा सांगणारांविरुद्ध