पान:प्रमाणशास्त्र.pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१९६ न्यायसंबंधी लेख.


तक्रार असून तिचा त्या कोर्टाने खरोखर ठराव केलेला होता; नाही तर त्या गोष्टीविषयीं तो निवाडा निश्यायक पुरावा होणार नाही, आणि एकाद्या नंतरचा दाव्यांत त्या गोष्टीची कदाचित् गैरशाबिती होईल.

 ३६४. चाली, व प्राचीन भोगवटे, दस्तुऱ्या वृत्तीचा प्रदेशाचा, किंवा प्रान्ताचा, किंवा जाहगिरीचा सीमा; तरीचे हक्क, रस्ते, किंवा समुद्रकाठचे धके, इत्यादि दुरुस्त करण्याची जबाबदारी; आणि यांसारिख्या इतर सार्वजनीन कृत्यांविषयी निवाडे, हे, या ग्रंथाचे कलम ३६१ यांत लिहिलेल्या नियमांस दुसरे अपवाद होत. अशा बाबतीत एकादा निवाडा पक्षकाराविरुद्ध निश्चायक होईल; इतकेच नाही, तर तिऱ्हाईतांविरुद्धही ग्राह्य होईल; परंतु निश्चायक होणार नाही, तथापि तो लौकिकासंबंधी पुरावा समजून मान्य करण्यांत येईल.

 ३६५, फौजदारी आरोपांतून मुक्तता, ही दिवाणी मुकदम्यांत निरपराधीपणाविषयी पुरावा होत नाही. आणि जा पक्षी एकाद्या पक्षकारास आपली अपराधमुक्तता झाल्याची गोष्ट पुराव्यांत देऊन फायदा करून घेता येत नाही, त्याच प्रमाणे एकाद्या फौजदारी आरोपांत त्याजवर झालेलें अपराध स्थापन, त्याणे आपला अपराध स्वमुखाने कबूल केला नसल्यास, त्याचा विरुद्ध पुरावा होत नाही. कारण असा जर तो पुरावा धरला, तर त्यांत अन्योन्यभाव राहणार नाही. बहुतेक फौजदारी चार्जाचा खटल्यांत सरकार वादी असून ते सरकार दिवाणी मुकदम्यांत पक्षकार