पान:प्रमाणशास्त्र.pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेख.

१९५

होत नाहीं; कारण जसा एकादा निवाडा एकाद्या मनुष्यास प्रतिकूळ असला तरी त्याचा विरुद्ध त्याचा उपयोग करितां येत नाही, तसा त्या निवाड्यावरूनच त्याजला फायदा करून घेऊ देतां येत नाही, कारण तसे करणे हा अन्याय आहे, असे मानले आहे.

 ३६२. सर्व जनाविरुद्ध निवाडे, म्हणजे जे निवाडे लायक कोडताने विवक्षित विषयावस्थेविषयी केलेले असतात, ते जसें, एकादे गलबत मनाई केलेला माल घेऊन गेल्याचा चार्जावरून लायक महसुलाचा अम्मलदारांनी केलेले अपराधस्थापन, घटस्फोटाविषयी केलेला ठराव, मृत्युपत्रावरून मोबेट म्हणजे खरेपणा. विषयींचा दाखला, आणि कदाचित् या मुलकांत द. त्तकाविषयी झालेले निवाडे, ही विवक्षित विषयावस्थेविषयी झालेल्या निवाड्यांची उदाहरणे होत. असे निवाडे सर्व जगाविरुद्ध निश्चायक मानले आहेत. ते असे मानण्याचे अंशतः कारण असे आहे, की अशा प्रकारचा पुष्कळ खटल्यांत जा मनुष्याचा हितास व्यत्यय येण्यासारिखा असतो त्याणे पाहिजे तर त्या मुकदम्यांत पक्षकार व्हावे. दुसरे असे आहे, की स्वतः त्या निवाड्यावरून दाव्याचा विषयाचा स्थिबीचा एकदम शेवटील निकाल झालाच असतो, आणि तो नंतर फिरविला जाऊ शकत नाही. आणि तंटे मिटवावे, हेही, असे निवाडे निश्यायक मानण्याचे एक कारण आहे.

 ३६३. तथापि पूर्वोक्त जातीचा निवाड्यांत असे दिसून आले पाहिजे, की त्या गोष्टीविषयी प्रत्यक्ष