पान:प्रमाणशास्त्र.pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१९४
न्यायसंबंधी लेख.

असल्यावांचून त्या कैदीस त्याजवर आणिलेल्या नव्या चार्जात, आपल्यावर प्रथम चार्जीत अपराध स्थापित झाला होता, किंवा आपली दोषांतून मुक्ति झाली होती, अशी तक्रार करण्याचा त्याजला अखत्यार नाही; कारण त्यांतील मुद्दे भिन्न होतील. त्याच प्रमाणे एकादा कैदी, घर फोडून आत शिरून अचा अमुक माल चोरल्याविषयींचा चार्जातून मोकळा झाला असल्यास, तेच घर फोडून बचा निराळा माल चोरिल्या बदलचा त्याजवरील दुसन्या चार्जात, आपली पहिल्या अपराधांतून मुक्तता झाली, ही तक्रार त्याजला सांगता येत नाही.

 ३६१. परंतु एकाद्या न्यायाचा कोर्टसमोर जो पुरावा आला असेल, आणि जे वादविवाद झाले असतील, त्यांवरूनच निवाडा देणे, हे कोटींचे कर्तव्य होय; आणि त्यांतील प्लीडिंगांवर जा मनुष्याचा अधिकार नसतो, किंवा जास साक्षीदार हजर करण्याची किंवा साक्षीदारानां प्रतिप्रश्न करण्याची सवड नसते, किंवा जाला अपीलाचा कांहीं हक्क नसतो, अशा, पक्षकाराहून भिन्न, तिसन्या मनुष्यास त्या निवाड्यावरून कोणत्याही तऱ्हेने बाध यावा, ही गोष्ट साधारणतः अयोग्य होईल; यास्तव कांही खाली लिहिलेले अपवाद खेरीज करून असा साधारण नियम आहे, की कोणताही निवाडा तिऱ्हाइने मनुष्याविरुद्ध पुरावा होत नाही. आणि तिऱ्हाइने मनुष्याचा प्रतिपक्षी त्या निवाड्यांत पक्षकार असला तथापिहो तो निवाडा त्या तिऱ्हाइने मनुष्याचा तरफे पुरावा