पान:प्रमाणशास्त्र.pdf/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेख.

१९३

पक्षकारांचा दरम्यान किंवा त्यांचा हक्काने दावा सांगणारांचा दरम्यानचा चौकशीत एकाद्या प्रत्यक्ष ठराविलेल्या बाबतीविषयी निश्चायक असतो, असा साधारण नियम आहे. परंतु एकादी बाबत अन्य गोष्टीचा संबंधाने प्रसंगवशात् चौकशीत निघाली असेल. तिजविषयी, किंवा निवाड्यावर वादविवाद करून अनुमित अशाच दुसऱ्या गोष्टींविषयी, तो निवाडा पुरावा होत नाही. जा गोष्टीविषयी निर्णय केला असेल, तीच गोष्ट दोन्ही मुकदम्यांत एकच असली पाहिजे; परंतु याचा अर्थ पदशः घेऊ नये. उदाहरण, एकाद्या मेंढयांचा कळपांतील कित्येक मेंढरे मेली असतील, आणि दरम्यान कित्येक नवीन उत्पन्न झाली असतील, तथापि तो कळप एकच समजला पाहिजे. दोन्ही मुकदम्यांत मुद्दा एक आहे की काय, याविषयी पारख करणे, ती, एकाच पुराव्यावरून दोन्ही मकदम्यांची शाबिती होत्ये किंवा नाही याविषयी विचार करून करावी, ही युक्ति योग्य आहे, असे म्हटले आहे.

 जर मद्यांतील बाबत एकच असेल, तर कज्जातील प्लीडिंगांचा स्वरूपांत फरक असल्यास तो अप्रधान होय. परंतु उलट पाहतां, एकाद्या कैदीवर अलाहिदा एक चार्ज असून दुसऱ्या चार्जाची शाबिती होण्याकरिता ज्या गोष्टी अवश्य असतील त्यांचा शाबितीवरून त्या कैदीवर पहिला आरोप स्थापित करितां आला असता अशा तऱ्हेचा पहिला चार्न