पान:प्रमाणशास्त्र.pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१९२
न्यायसंबंधी लेख.

"दाव्यांत, ज्या बाबतीविषयी माजिश्रेटावर हुकुमत असेल त्या बाबतीत त्याणे केलेले अपराध स्थापन, त्यांत "उघड व्यंग नसल्यास, त्यांत लिहिलेल्या घडलेल्या "गोष्टींविषयी निश्चायक पुरावा होते;" आणि जा घडलेल्या गोष्टींवरून तो ठराव झाला, त्याचे इतर साक्षीनीं निराकरण करण्याची मोकळीक वादीला मिळत नाही. घडलेल्या गोष्टींविषयी माजि स्त्रेयाची चुकी झाली असल्यास, अपील करणे, हा त्याला योग्य उपाय आहे. आणि तो ठराव रद्द होईपर्यंत त्यांतील घडलेल्या गोष्टींवरून दावा चालणार नाही. आणि माजिस्टाने हुकुमतीबाहेर अंमल चालविला, असे वादीचे म्हणणे असेल, तरी त्या ठरावावरून त्याजला हुकुमत आहे, आणि तो कायदेशीर व यथाविधि आहे असे दिसल्यास वादीला इतर साक्षीने ते (माजिस्त्रेयस हुकमत नव्हती हैं) शाबित करण्याचा अखत्यार नाही. न्यायाधीश आणि इतर अम्मलदार जे निवाडे देण्यास ते लायक असतात, त्या निवाड्यांसंबंधी माजिस्टाविषयी सदरील बचाव त्यांस लागू होतो असे दिसते, आणि असा बचाव होणे, हा, निवाड्यांपासून होणाच्या कायदेशीर परिणामांपैकी एक परिणाम आहे.

 ३६०, जा गोष्टींविषयी ठराव करण्यांत आला असेल, त्यांसंबंधी निवाड्यांपासून होणाऱ्या परिणामांविषयी आपण आतां विचार करूं. कोणत्याही कोर्टाने कायद्यावरून मिळालेल्या अधिकाराप्रमाणे केलेला निवाडा, तो झाल्यानंतरचा दुसऱ्या चौकशीत त्याच