पान:प्रमाणशास्त्र.pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१९०
न्यायसंबंधी लेख

शाबिती आणि त्यांपासून परिणाम यांविषयी आपण आतां अधिक सविस्तर विचार करूं.

 ३५६. जिल्ह्यांतील कोडतांत सहीनिशी खरी केलेली नकल हजर करून निवाड्याची शाबिती केली जाते ती नकल छापी कागदावर असली पाहिजे. (या ग्रंथाचे कलम ३५० व ३५१).

 ३५७. सन १८५९ चा आक्ट ८ कलम २८४ तागाईत २८७ यांत, एकाद्या दिवाणी कोर्टाचा निवाड्याची नकल जा कोर्टाला अमलात आणण्याची हुकुमत असेल त्याजकडे, तो निवाडा अमलांत आला नाही, याविषयी दाखल्यानिशी आणि जे पूर्वी हुकुम झाले असतील त्यांचा न्यायाधीशाचा सहीनिशी व त्या कोर्यचा शिक्यानिशी नकला पाठवून देऊन, डिक्री देणाऱ्या कोर्याचा हुकुमतीबाहेर ती डिक्री अ. मलांत आणण्याची रीति लिहिली आहे. आणि कलम २८६ अन्वये त्या निवाड्याचे, किंवा हुकमनाम्याचे, किंवा नकलेचें, किंवा शिक्याचे, किंवा सहीचे, किंवा त्या कोडताचा हुकुमतीविषयींचें, प्रमाण मागण्याची जरूर नाहीं;" परंतु काही असाधारण प्रसंगी तसें प्रमाण मागण्याची कारणे लिहून " प्रमाणे मागण्याचा अधिकार आहे."

 ३५८. एकादा निवाडा हजर केल्यास, तो झाला आहे याविषयी, व त्याचा तारिखेविषयों व त्याचा कायदेशीर परिणामाविषयी, त्यांतील पक्षकाराविरुद्ध मात्र तो निश्यायक असतो असें नाहीं; परंतु तो सर्व जगाविरुद्धही निश्यायक असतो. असा