पान:प्रमाणशास्त्र.pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


न्यायसंबंधी लेख

१८९

देऊन व त्याचा आपण घेऊन पुनः वाचण्याची जरूर नाही, परंतु, तसे त्यांणी परस्पराचे कागद घेऊन पुनः तपासावे, ही रीति खचित निर्भय आहे. ती नकल बिनचूक आणि पूर्ण असून, असलेत अक्षरशः सगळे शब्द लांबचलांब लिहिले असल्यास तीत संक्षेपाने नसावें. अशी नकल पुराव्यांत वाचण्यापूर्वी, असल दस्तऐवज योग्य रक्षणाचा ठिकाणाहून किंवा योग्य अम्मलदाराचा हातून आला आहे असेंही शाबीत झाले पाहिजे.

 नकला करण्याचा यंत्राने केलेल्या नकलेस पुराज्याची जरूर नाही. (सन १८५५ चा आक्ट २ कलम ३५)

 ३५४. एकादा मनुष्य सरकारी कामदाराचा नात्याने काम करीत आहे, ही गोष्ट, तो त्या जाग्यावर योग्यरीतीने नेमिला होता याविषयी प्रथमदर्शनी परावा होय. आणि यास्तव त्याचा नेमणुकीविषयी साक्षी हजर करण्याची साधारणतः जरूर नसत्ये.

 जो एकादा मनुष्य, आपणास सरकारी हुद्दा आ• हे म्हणून खोटसाळरीतीने बहाना करितो, तो पिनकोडचा १७० व १७१ कलमां अन्वये दंडास व कैदेस पात्र होतो, हे ध्यानात ठेविले पाहिजे.


न्यायसंबंधी लेख.

 ३५५. फैसल नामे, पुरशिसा आणि जबान्या इत्यादि जे सरकारी लेख न्यायसंबंधी आहेत, त्यांची