पान:प्रमाणशास्त्र.pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१८८
सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे

"पुराव्यास देण्यास योग्य ठरविला असेल त्या प्रसंगी त्यावर जो शिक्का किंवा छाप किंवा सही किंवा निशाण "असले पाहिजे त्याची शाबिती झाल्यावांचून, किंवा "ज्या अधिकारापासून तो झाला असावा त्या अधिकाराची शाबिती झाल्यावांचून, तो प्रथमदर्शनी "पुरावा आहे असे समजावे." ( या ग्रंथाची कलमें १७५, २३७ व ३५७ पहा ).

 ३५२. परंतु जबानीत खोटी प्रतिज्ञा केल्याचा किंवा बनावट दस्तऐवज केल्याचा व या सारिख्या दुसऱ्या कज्जांत, एकादा दस्तऐवज होता किंवा नाही, याविषयी, किंवा त्यांतील मजकुराविषयी प्रत्यक्ष वाद पडल्यास, असल दस्तऐवज हजर केला पाहिजे; आणि या देशांत नकला सहीनिशी खऱ्या करून देण्याची चाल इतकी गढळ आहे, की त्यांचा अचूकपणा विषयी संशय घेण्यास कांहीं कारणे असल्यास कोडते साधारणतः असल दस्तऐवज पाहण्यास खुशी असतात.

 ३५३. ज्या नकलेविषयीं एकादा मनुष्य, आपण नकलेचा मुकाबिला पाहिला आहे, अशी शपथ वाहण्यास, किंवा नकल रुजू पाहतां खरी आहे, असे शपथेवर प्रतिज्ञात करण्यास सिद्ध असतो, त्या नकलेस 'तपासलेली' किंवा 'शपथपूर्वक' नकल असें म्हणतात. टेलर, स्टारकीशी भिन्नमत होऊन असे लिहितो, की त्या मनुष्याने त्या नकलेची रुजुवात ती दुसऱ्याने मोठ्याने वाचल्यावरून केली असल्यास, जे मनुष्य रुजुवात पाहतात त्यांणी परस्परांचा हातांतील कागद उलट एकाने आपला दुसऱ्याचा हाती