पान:प्रमाणशास्त्र.pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे

१८७

पाहिजे त्यास साक्षीकरितां दिल्याने मोठी गैरसोय होईल, सबब सहीनिशी खऱ्या केलेल्या किंवा तपासलेल्या नकलेने त्याची शाबिती करण्याचा साधारणतः अखत्यार आहे. नकलेची नकल कधीही मान्य केली जाणार नाही.

 ३५१. लेखाने खातरी केलेली किंवा सहीने खरी केलेली नकल, म्हणजे जा अम्मलदारास ती देण्याचा अधिकार असतो त्याणे, खरो नकल, असा शेरा लिहून सहीनिशी दिलेली असेल ती अशा नकला बहुत करून सर्वत्र पुराव्यांत घेण्यांत येतात, आणि कित्येक बाबतीत कायदे कर्त्या मंडळीचा आक्यावरून त्या ग्राह्य आहेत असे स्पष्टपणे ठराविले आहे. सन १८५५ चा दुसऱ्या कायद्याचा ५६ व्या कलमांत असे लिहिले आहे, की "कोणताही स्टाट्यूट "किंवा आक्ट, किंवा कायदा, किंवा कानु हल्ली अमलांत असेल, किंवा कोणतेही स्टाट्यूट, किंवा "आक्ट, यानंतर अमलांत येतील, त्यांवरून जो दाखला, किंवा सही केलेली नकल, किंवा इतर दस्त"ऐवज कोणत्याही इनसाफाचा कोर्टात कोणत्याही "बाबतीविषयी पुराव्यास घेण्यास योग्य असेल, तो "दाखला, किंवा सही केलेली नकल, किंवा इतर दस्तऐवज, जो स्टाट्यूट, किंवा आक्ट, किंवा कायदा "किंवा कानु, यावरून पुराव्यास देण्यास योग्य होत "असेल, त्या स्टाट्युटांत, किंवा आक्टांत, किंवा "कायद्यांत, किंवा कानूंत सांगितलेल्या फरम्या प्रमाणे "व रीती प्रमाणे तो लिहिला असेल तर जा प्रसंगी तो