पान:प्रमाणशास्त्र.pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सार्वजनीन लेखांचा पुरावा वैगरे

किंवा त्यांचा सहीनिशी खन्या केलेल्या किंवा तपासलेल्या नकला आणवून शाबीत करण्याचा कोर्गस अखत्यार आहे. ते दस्तऐवज ठेवण्याचा जा अम्मलदाराचा हुद्दा असतो त्या अम्मलदाराची योग्यता आणि लौकीकाअन्वये विशेषेकरून अशा दस्तऐवजांची भारदारी समजली जात्ये. जे अम्मलदार खेड्यांतील दफ्तरें ठेवितात, त्यांत कधी कधी खोट्या रकमा लिहून ठेवण्याविषयी ते मोहास फार पात्र असतात ही गोष्ट भीतिप्रद आहे.

 ३४९. जे दफ्तरी लेख, किंवा कोणतेही दस्तऐवज, जे लेखी असावे असा कायदा असेल, त्यांतील मजकुराचा शाबिती करितां सदरड लेख किंवा दस्तऐवजाचा मोबदला तोंडचा पुरावा देतां येत नाही; म्हणून निवाडे, जबान्या, मुचलके इत्यादि सार्वजनीन लेख तोंडचा साक्षीने शाबीत करितां येत नाहीत. मृत्युपत्रे आणि इतर दस्तऐवज जे कायद्यावरून लेखी असले पाहिजेत, त्यांचा शाबिती करितां हाच नियम लागू आहे. परंतु जी जबानी किंवा पुरशीस बेकायदा झाल्या कारणाने वर्ज्य केली असेल, किंवा लिहून ठेविली नसेल, तीस हा नियम लागत नाही. उदाहरण; एकाद्या कैदीने किंवा साक्षीदाराने एका वेळी लेखी जबानी दिली असेल, आणखी दुसऱ्या वेळी तोंडचीच जबानी दिली असून ती लिहून ठविलला नसेल, तर शेवटील जबानी तोंडचा साक्षीने शाबीत करण्याचा अखत्यार आहे.

 ३५०. परंतु कामाचे सार्वजनीन दस्तऐवज