पान:प्रमाणशास्त्र.pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे

१८५

 ३४७. जा सरकारी दफ्तरांत, किंवा सरकारी संबंधाचा दस्तऐवजांत, कायद्यावरून किंवा आपल्या हुद्याचा नात्याने सरकारी अंमलदारास अमुक गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात, त्यांस शपथ आणि प्रतिप्रश्न यांचा नेहमीचा कसोटीची बळकटी नसली, तथापि तशा गोष्टीविषयींचा पुराव्यास ती दफ्तरें व दस्तऐवज साधारणतः नेहमी मान्य केले जातात. जन्म, मरण, व लग्न, यांविषयी कायद्यावरून ठेविलेली दफ्तरें ही वर सांगितलेल्या दफ्तरांप्रमाणेच आहेत असे समजावे. असे दस्तऐवज पुराव्यांत घेतले जातात, कारण याच कामाकरितां नेमिलेले भरवशाचा सरकारी अम्मलदारांनी ते ठेविलेले असतात, म्हणून, आणि ज्या गोष्टींसंबंधी ते असतात त्या गोष्टी सार्वजनीन स्वरूपाचा असून, बहुधा पुरातन काळचा असतात, आणि त्या गोष्टी साक्षीदारांचा योगेंकरून शाबीत करणे मुसकील पडतें, सबब असे दस्तऐवज पुराव्यांत मान्य केले जातात. परंतु असे सार्वजनीन दस्तऐवज कायद्यावरून किंवा सरकारी हुद्याचा नात्याने करणे आवश्यक असले पाहिजे; आणि असें असल्यास मात्र मान्य केले जातात, आणि जा गोष्टी सरकारी अम्मलदाराने लिहून ठेविल्या पाहिजेत, त्या गोष्टी खेरीज इतर गोष्टींची शाबिती करण्यास्तव ते मान्य केले जात नाहीत (या ग्रंथाची कलमे २२२ व २२३ पहा ).

 ३४८. शेवटी लिहिलेल्या प्रकारचे सार्वजनीन दस्तऐवज, योग्य ठिकाणांतून मूळ दस्तऐवज आणवून