पान:प्रमाणशास्त्र.pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१८४
सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे.

पुरावा करण्याचा रीतीविषयीं टेलर याणे असे लिहिले आहे, की छापणारास आपल्या स्वतांचा हिताने आणि सरकारी हुद्याचा हेतूने अचूकपणा राखावा लागतो; त्याखेरीज एकादी गोष्ट सरकारांतून निघालेली नसून ती सरकार हुकमाने निघाली आहे असें बुद्धिपूर्वक छापणे, हा गुन्हा होईल ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे.

 ३४५. या ग्रंथाचे कलम ३१८ व ३१९ यांत आपण असे लिहिले आहे, की सार्वजनीन इतिहास, किंवा विद्या, किंवा शास्त्र, किंवा कला, किंवा परमुल. की कायदा, या विषयांवर प्रसिद्ध केलेले ग्रंथ पाहण्याचा अधिकार इ. स. १८५५ चा आक्ट २ कलम ११ व १२ यांवरून कोर्टास आहे; परंतु, इंग्लिश् कायद्यावरून अशा प्रकारचा पुरावा सार्वजनीन इ. तिहासाचा बाबतींत ग्राह्य होतो, आणि शास्त्र, कला, किंवा परमुलकी कायदा, यांविषयींचे प्रश्न त्या त्या बाबतीत जे साक्षीदार कुशल असतील त्यांचा साक्षीवरून शाबीत करण्यांत येतात.

 ३४६. सन १८५५ चा २ च्या आक्टाचा १३ व्या कलमांत असे लिहिले आहे, की " सरकारचा "हुकुमावरून, किंवा शहर सुधारणाऱ्या सार्वजनीन " मंडळीचा हुकुमावरून नकाशे केले असतील, आणि कोटीत वाद पडलेल्या कारणासाठीच केलेले " नसतील, ते प्रथमदर्शनी खरे आहेत असे समजावें; "(व त्यांचा खरेपणाविषयी) आणखी प्रमाण न "मागतां ते पुराव्यांत कबूल करावे."