पान:प्रमाणशास्त्र.pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे

१८३

"प्रथमदर्शनी पुरावा आहे असे सदरहु प्रकारचा सर्व "कोर्टानी व मनुष्यांनी समजावे."

 ३४२. सदरहु आक्टाचा १० व्या कलमांत असें ठरविले आहे,की "पब्लिक स्टाटयूटावरून किंवा आक्टावरून, किंवा कायद्यावरून, किंवा कानूवरून, किंवा कोणत्याही न्यायाचा कोर्टाचा, किंवा बोर्डाचा, किंवा "जमाबंदीखात्यांतील अम्मलदाराचा हुकुमावरून "कोणतीही जाहीरखबर प्रसिद्ध केल्याची दर्शविली "असेल, ती जाहिरखबर जा सरकारी ग्याझेटांत किवा वर्तमानपत्रांत असेल, ते ग्याझेट किंवा वर्तमानपत्र खाली लिहिलेल्या गोष्टीविषयी प्रथमदर्शनी "पुरावा आहे, असे सदरहु प्रकारचा कोणत्याही कोर्टानें, किंवा मनुष्याने कबूल करावें. म्हणजे, सदरहु प्रकारची जाहीरखबर जा आधारावरून लावल्याचे दर्शविले असेल,त्याच आधारावरून ती यथायोग्य रीतीने प्रसिद्ध केली आहे,याविषयी ते "ग्याझिट किंवा वर्तमानपत्र प्रथमदर्शनी पुरावा आ"हे, असें कबूल करावें."

 ३४३. पार्लमेण्टाचे सार्वजनीन आक्ट न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेविण्याचे आहेत, सबब त्यांची शाबिती करणे किंवा ते हजर करणे अवश्य नाही, आणि बादशाहाचा छापणाराने छापिलेली अशी नकल, ही फकत हजर केली म्हणजे पार्लमेण्टाचा असार्वजनीन आक्याविषयी प्रथमदर्शनी पुरावा होत्ये; (स० १८५५ चा आ० २ क. ३). 1३४४. ग्याझिट वर्तमानपत्र केवळ हजर करून