पान:प्रमाणशास्त्र.pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१८२
सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे

"कालनीचा किंवा डिपेण्डेन्सीचा सरकारचे कोणतेही " ग्याझेट ( म्ह० वर्तमानपत्र ) वर सांगितलेल्या कोणत्याही कोर्टासमक्ष किंवा मनुष्यासमक्ष हजर केल्यानेच त्या ग्याझेट पत्राचा पुरावा होतो असे " समजावें." आणि कलम ८ यांत असे लिहिले आहे, की " सर्व जाहीरनामे, व सरकारचे लेजिस्ले. "टिव किंवा एक्सिक्यूटिव आक्ट, व नेमणूकी, व " योजना, व सरकारी इतर सूचना, सदरहु प्रकारचा " ग्याझिट वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होतील त्यांची शाबिती करणे ती, सदरहु प्रकारचे ग्याझिट वर्तमानपत्र हजर करून करावी, आणि सदरहू प्रकारचा " ग्याझेटांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यावरून, " व सरकारी लेजिस्लेटिव किंवा एक्सिक्यूटिव आक्यावरून, व नेमणुकीवरून, व योजनेवरून, व सरकारी इतर सूचनेवरून, जा सार्वजनीन प्रकारचा " गोष्टीची जाहिरात देण्याचा इरादा असेल त्या गोष्टीविषयी ते जाहीरनामे, व सरकारचे लेजिस्लेटिव " किंवा एक्सिक्यूटिव आक्ट, व नेमणूकी, किंवा " योजना, व सरकारी इतर सूचना, प्रथमदर्शनी पुरावे आहेत असे समजावें."

 ३४१. त्याच आक्टाचा ९ व्या कलमांत असे लिहिले आहे, की " कायदे करण्याकरितां स्थापिलेल्या कौन्सिलांत इंडियाचे गव्हरनर जनरल हे या"पुढे कोणताही आक्ट करितील, त्या आक्टांत सार्व"जनीन प्रकारचा कोणत्याही गोष्टीविषयी मजकूर "लिहिला असेल, तो, त्या गोष्टीचा खरेपणाविषयी