पान:प्रमाणशास्त्र.pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सार्वजनीन लेखांचा पुरावा वगैरे

१८१

निवाड्यांतील, किंवा ठरावांतील, किंवा या सारिख्या दस्तऐवजांतील पक्षकारांचा हेतूची आठवण रक्षण करून ठेवण्याकरितां केलेले असतात, अशा लेखांस मात्र त्या धंद्याचा विशेष लाक्षणिक परिभाषेनें लेख,' किंवा 'लेखी पुरावा,' असे म्हणतात.

 ३३९. लेख सार्वजनीन किंवा खासगत असतात. सार्वजनीन लेखांत कायदे करणाऱ्या मंडळीचे किंवा सरकारचे आक्ट, किंवा न्यायाचा कोर्टाची कृत्ये किंवा ठराव, किंवा जबान्या, पक्षकारांचा पुरशिशी, आणि या प्रकारचे दस्तऐवज यांचा समावेश होतो. मनुष्यांनी आपल्या खासगत नात्याने केलेली खते किंवा दस्तऐवज, किंवा करार, किंवा मृत्युपत्रे वगैरे लिहिली असतात त्यांचा खासगी लेखांत समावेश होतो.


सार्वजनीन लेखांचा पुरावा आणि
त्यांपासून परिणाम.

 ३४०. सन १८५५ चा २ या आक्टाचा २ या व ३ च्या कलमांवरून इंडियन् आणि ब्रिटिश कायदे करणान्या मंडळीचे आक्ट कोटीनी न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेवावे, असे या ग्रंथाचा ५ व्या कलमांत लिहिले आहे. त्याच आक्याचा ७ व्या कलमांत असे लिहिले आहे, की "ब्रिटिश सरकार. " चा अमलांतील कोणत्याही मुलकाचा, किंवा