पान:प्रमाणशास्त्र.pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१८०
दस्तऐवजी पुराका

 सावकारावर दिलेला चेक (म्ह० चिठी) दस्तऐवज होय."

 वकालतनामा दस्तऐवज होय."

 :  “पुरावा म्हणून उपयोग करण्याचा इराद्याने " केलेला किंवा असा उपयोग जाचा करितां येईल, " असा नकाशा अगर नमूना, तो दस्तऐवज होय."

 " जांत अमुक गोष्ट अमुक रीतीने करावी हे लिहिले आहे तो लेख दस्तऐवज होय."

 " व्याख्या दुसरी व्यापारी लोकांचा चालीप्रमाणे, अगर दुसऱ्या चालीप्रमाणे, वर्ण, "अगर अंक, अगर खुणा, यांणी जो अर्थ होतो, " तो अर्थ, जरी वास्तविक निघत नाही, तरी " या कलमाप्रमाणे असावा तसा अर्थ, त्या वर्णानी, अगर त्या अंकांनी, अगर त्या खुणांनी "झाला असे समजावें."

 "क याचा हुकुमाप्रमाणे या हुंडीचा पैसा द्यावा " अशा लिहिलेल्या हुंडीचा पाठीवर, क आपले नाव लिहितो. व्यापारी लोकांचा चालीप्रमाणे त्या " पाठीवरील लेखाचा अर्थ असा होतो, की ही हुंडी "जाचा हाती असेल त्यास तिचा पैसा द्यावा. तो "पाठीवरील लेख दस्तऐवज आहे, आणि जाचा " हाती हुंडी आहे त्यास पैसा द्यावा, असे शब्द किंवा या अर्थाचे दुसरे शब्द सहीचा वर लिहिले "असते तर त्या पाठीवरचा लेखाचा अर्थ जसा होतो, तसा याचा केला पाहिजे."

 ३३८. जे लेख एकाद्या करारांतील, किंवा