पान:प्रमाणशास्त्र.pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दस्तऐवजी पुरावा

१७९

किंवा चिन्हांनी मनुष्याचे विचार दर्शित केले असतात, तिचा समावेश होतो. उदाहरण, कागद मात्र दस्तऐवज समजले जातात असे नाही, परंतु शिला, भिती, अथवा वृक्ष, जांवर लेख खोदलेले असतात ते सर्व दस्तऐवज होत; आणि एकाद्या काठीवर खुणा करून हिशेब ठेविला असल्यास ती काठी दस्तऐवज होय; परंतु तसबिरा किंवा सांचे यांस दस्तऐवज असें मानीत नाहीत.

 पीनल कोडाचा २९ व्या कलमांत खाली लिहिलेली व्याख्या आहे. "दस्तऐवज या शब्दाचा अर्थ "कोणत्याही पदार्थावर वर्ण, अगर अंक, अगर खुणा "यांचा योगानें, अगर या साधनांपैकी अनेकांचा "योगाने काही गोष्ट व्यक्त केली अगर वर्णिली असेल, "त्या गोष्टीचा पुरावा म्हणून उपयोग करण्याचा इराद्याने, किंवा जाचा उपयोग असा करितां येईल, "असा लेख."

 "व्याख्या पहिली. ते वर्ण,अगर ते अंक अगर त्या "खुणा कशानेही अगर कशावरही केल्या,किंवा तो पुरावा न्यायाचा कोर्टात देण्याचा इराद्याने केला असो "किंवा नसो, किंवा त्याचा उपयोग पुढे होवो किंवा न होवो, कसेही असले तरी चिंता नाही."

उदाहरणे.

"एकाद्या लेखांत कराराची कलमें लिहून तो " लेख त्या कराराविषयी पुरावा म्हणून त्याचा पुढे " उपयोग करितां येईल, तर तो लेख दस्तऐवज होय,