पान:प्रमाणशास्त्र.pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१७८
दस्तऐवजी पुरावा.

होत असावी, अशी इंग्लंडांतील कोडतांत वहिवाट आहे; ती या मुलकांत अनुसरण्यास योग्य आहे.

 ३३५. दुसरे, एकाद्या गुन्ह्यांतील मिलाफ्याचा साक्षीचा प्रत्यंतरास, दुसरा पुरावा असला पाहिजे, आणि तो विशेषे करून आरोपित मनुष्याचा ओळखीविषयी आणि त्याणे त्या अपराधांत जो वांटग उचलिला असेल त्याविषयी असला पाहिजे; कारण या गोष्टी बनावून सांगण्याविषयी त्या मिलाफ्यास विशेषे करून लोभ उत्पन्न होतो. अपराध कोणत्या प्रकारे घडला, या बाबतीत, त्या अपराधांत सामील असणाऱ्या मनुष्याची जी साक्ष असेल तिचे प्रत्यंतर असून, त्यांतील कैदीचा गुन्ह्यांविषयीही प्रत्यंतरी पुरावा पाहिजे, नाही तर चालणार नाही. तसेच एका मिलाफ्याचा साक्षीस दुसऱ्या मिलाफ्याचा साक्षीचें, किंवा त्याचाच बायकोचा साक्षीचें मात्र प्रत्यंतर असल्यास, तें बस नाही.

 ३३६. जो एकादा मिलाफी, पुढे घडावयाचा अपराधाविषयी आगाऊ बातमी देऊन, अम्मलदाराचा हुकुमावरून अपराध करणारांची सहजांत उघडीक व्हावी यास्तव त्यांजबराबर वर्ततो, त्याचा साक्षीस प्रत्यंतरी पुरावा नको.


दस्तऐवजी पुरावा.

 ३३७. 'दस्तऐवज या शब्दाचा अर्थ फार मोघम आहे. त्यांत, जा एकाद्या वस्तूवर अक्षरांनी