पान:प्रमाणशास्त्र.pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पुराव्याचे परिमाण.

१७७

मनुष्यास एक वेळ अभिवचन मिळाले असेल, त्याच अपराधाचा आरोप त्याजवर आणतां येत नाही; आणि याविषयी सर आर्चबोल्डू आलिसन याणे असें योग्य रीतीने लिहिले आहे, की “ एकाद्या साक्षीदाराने पूर्वी उघड केलेला मजकूर फिरविल्याने "किंवा त्याजला साक्षीस उभा केल्यानंतर एकादा "स्वीकाराचा मजकूर सांगण्यास नाकबूल केल्याने "पुष्कळ ठिकाणी न्याय बुडेल; परंतु कोडतापुढे उभे "राहिलेल्या आपल्या सोबत्यांचा विरुद्ध जितका मजकूर आपण सांगू त्या प्रमाणे आपला पुढे बचाव "आहे असे त्या साक्षीदारास समजेल, तर तो न्याय "विशेष जोखमांत पडेल."

 ३३४. सन १८५५ सालांत कलकत्ता एथील निजामत अदालतीत मोहादीब याचा कज्जांत दिलेल्या मौलवीचा अभिप्रायावरून असे दिसते, की मुसलमानी शास्त्राप्रमाणे एकट्या सामीलदाराचा साक्षीवरूनच कैदीवर अपराधस्थापन होत नाही, आणि जा मनुष्याने प्रथम अपराध करून मागाहून विश्वासघाताने आपल्या सोबत्यांची उघडीक केली आहे, अशा मनण्याचा साक्षीविषयी संशय घेण्यास विशेष मजबद सबब असत्ये; आणि आपला स्वतांचा अपराध उघडकीस आला सबब निरापराधी मनुष्यास तो गंतव पाहत असेल, याविषयी इतकी धास्ती असत्ये, की अशा साक्षीचा आधारास. जर दुसरी अधिक भरवसा ठेवण्याजोगी साक्ष नसेल तर या साक्षीकडे जूरीने संशयदृष्टि ठेवावी, अशी त्यांजला हमेशा सूचना