पान:प्रमाणशास्त्र.pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१७६
पुराव्याचे परिमाण

त्या मनुष्याची साक्षीदारा प्रमाणे साक्ष घेण्याचा अधिकार आहे, (स० १८६१ चा आ० २५ क० २०९ व २१०). परंतु, "एकाद्या मनुष्याने संकेतावर माफी केली असतां, ज्या संकेतावर माफी मिळेल म्हणून बोलणे झाले होते त्या संकेता प्रमाणे वर्तला "नाही, म्हणजे त्याणे एकादी मुद्याची गोष्ट बुद्धिपूर्वक छपविली, किंवा खोटी साक्ष अगर खोटी "बातमी दिली; असे चौकशीचा वेळेस सेशन कोर्यचा नजरेस आल्यास, किंवा त्या खटल्यासंबंधी ४७ सदरकोर्यस कांही लिहून विचारिलें असतां सदर "कोर्टाचा नजरेस आल्यास, ज्या अपराधाबदल "माफी मिळेल म्हणून बोलणे झाले होते त्या अपराधाविषयी त्याची चौकशी होण्याकरितां त्या मनुष्यास पाठविण्याविषयी हुकूम करण्याचा अखत्यार त्या कोर्टाला आहे. (सन १८६१ चा आक्ट २५ कलम २११).

 ३३२, इंग्लिशू कायद्याचा कोडतांतील काम चालविण्याचा रीतीवरून सदरील आक्टांतील ठराव झाला आहे; परंतु त्याचा उपयोग दूरवर दृष्टि पोचवून केला पाहिजे, नाही तर बिटिश, अम्मलदारांची अभिवचने हलकी मानली जाऊन कैदीवर खोटसाळ रीतीने आरोप आणून आपला बचाव करण्याविषयी त्या अपराधांतील सामील असणार मनुष्यास लोभ उत्पन्न होईल.

 ३३३. स्काटलंडांत अभिवचनाचा परिणाम इतका काईमचा असतो, की जा अपराधांतील सामील