पान:प्रमाणशास्त्र.pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१७४
पुराव्याचे परिमाण.

आणखी राणीस मारण्याचा बेत करणे, अशा प्रकारचा राजद्रोहाची शाबिती करण्यास्तव दोन साक्षीदार नकोत.

 ३२८. राजद्रोहाचा गुन्हा शाबीन करण्यास्तव दोन साक्षीदार का असले पाहिजेत, या नियमाविषयी अनेक कारणे सांगतात; परंतु, " अशा खटल्यांत " सरकारचा सर्व अधिकाराविरुद्ध कैदी याजला " लढावे लागते, व तो सरकारचा अधिकार अशा " सार्वजनीन क्षोभाचा समयी विशेष करून निदेस " पात्र असतो; व राजद्रोहाविषयींचा कायद्याची म" र्यादा बराबर व्याख्यात नाही, व लोक ती यथार्थ " समजत नाहीत; आणि अपराध स्थापन होण्यापासून " आरोपित मनुष्यास आणि त्याचा कुटुंबास प्राप्त "होणारे परिणाम घोर व क्रूर असतात;" ही कारणे अति संभाव्य दिसतात.

 ३२९. इंग्लिश् कायद्याचा पाया इतर ठिकाणी जरी चांगला नसला, तरी खोट्या शपथेचा गुन्ह्याचा चौकशीचा न्यायाविषयी चांगला आहे, असे दिसते. त्यावरून खोट्या प्रतिज्ञेचा चार्जाची शाबिती करण्यास्तव दोन साक्षीदारांची साक्ष, किंवा कनिष्ठपैकी आरोपित मनुष्याची शपथ, आणि त्याचा निरपराधी. पणाविषयींचा अनुमानास मागें सारण्या सारिखा पुरावा तरी असला पाहिजे. एकट्याच साक्षीदाराचा साक्षीवरून मात्र चार्जाची शाबिती झाली असल्यास आरोपित मनुष्याचा शपथेविरुद्ध त्या साक्षी. दाराची मात्र शपथ असत्ये, म्हणून अशा ठिकाणी