पान:प्रमाणशास्त्र.pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पुराव्याचे परिमाण.

१७३

"असे समजावे; परंतु मिलाफ्याचा साक्षीचा मजबुदीविषयी, किंवा एका साक्षीदाराचा साक्षीचा मजबुदीविषयीं, खोट्या शपथेचा मुकदम्यांत कोर्टाचा "ज्या नियमावरून किंवा वहिवाटीवरून प्रत्यंतराचा "पुरावा अवश्य असेल, त्या नियमास, किंवा वहिवाटीस, सदरहु ठरावावरून व्यत्यय येतो, असे समजूं. "नये; (सन १८५५ चा आक्ट २ कलम २८).

 ३२६. राजद्रोहाचा कज्जांतील चार्जीत राजद्रोहाची जी उघड कृत्ये लिहिली असतील, त्यांचा शाबितिची साक्ष असली पाहिजे, आणि जे एका उघड कृत्ये चार्जात लिहिलेले नसून तेणेकरून चार्जात लिहिलेले उघड कृत्याची शाबिती होणे नसल्यासऱ्याविषयी साक्ष मान्य केली जाणार नाही.आणखी इंग्रेजी कायद्या प्रमाणे राजद्रोहाची शाबिती करण्यास्तव दोन साक्षीदार असले पाहिजेत; ते दोन्ही एकाच उघड कृत्याविषयी असावे; किंवा एकाच राजद्रोहाचा चार्जापैकी एका उघड कृत्याविषयी एक, आणि दुसऱ्या कृत्याविषयीं दुसरा; परंतु आरोपित मनुष्याने आपखुशीने उघड कोडतांत गुन्हा कबूल केल्यास, किंवा तो जबाब न देतां स्तब्ध उभा राहिल्यास, किंवा त्याणे तकरार करण्यास नाकबूल केल्यास, अशा पुराव्याची जरूर नाही.

 ३२५. परंतु कैदी हा सरकारचा रयत आहे, अशा सारिखी मुद्या बाहेरील गोष्ट नेहेमींचा रीतीप्रमाणे शाबीत करितां येते . राजद्रोहाची उघड कृत्ये शाबीत करण्यास्तव मात्र दोन साक्षीदार लागतात;