पान:प्रमाणशास्त्र.pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१७२
पुराव्याचे परिमाण.

आहेत, आणि त्या वैद्यांची संख्या कितीही असली तथापि त्यांचे अभिप्राय एकमेकांचा किती विरुद्ध पडतात, हे पाहण्यांत आले आहे. ज्या कज्जांत अनेक वैद्यांची साक्ष घेण्यांत येती, त्या बहुत करून प्रत्येक कज्जांत हाच प्रकार दिसून येतो; म्हणून एकट्यादुकट्या वैद्याची साक्ष घेणे ती फार सावधगिरीने घेतली पाहिजे असे दिसून येईल.

 ३२३. एकादा साक्षीदार आपल्या माहितीविषयी खोटी साक्ष देईल, तर तो घडलेल्या गोष्टीविषयी खोटी साक्ष दिल्याप्रमाणे शिक्षेस पात्र होईल. (पीनल कोड कलम १९५ व्याख्या २) पुरावा किती असावा याचे परिमाण.

 ३२४. पुरावा किती असावा, याचा परिमाणाविषयी असा साधारण नियम आहे, की साक्षीदारांची संख्या न पाहतां त्यांचे वजन पाहवे, आणि मागें सन १८१७ चा साली बंगाल एथील निजामत अदालतीचा कोर्टाने असे ठरविले होते, की जर एका साक्षीदाराचा साक्षीवर भरवसा होता, तर अपराध स्थापन करावयास ती बस होती.

 ३२५. “सदरहु प्रकारचा कोणत्याही कोटीत, "किंवा सदरहु प्रकारचा कोणत्याही मनुष्यासमक्ष, "राजद्रोहाखेरीज इतर मुकदम्यांत कोणत्याही गोष्टीची शाबिती करणे झाल्यास, पूर्ण भरवशाचा एका साक्षीदाराची प्रत्यक्ष साक्ष झाली म्हणजे पुरे,