पान:प्रमाणशास्त्र.pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अभिप्रायरूपी साक्ष

१७१

" केली असतील ती, आणि त्या कोर्यंत त्या मुलका" चा कायद्याचा पुराव्याविषयी जी पुस्तकें नेहेमी कबूल करितात असे शाबीत केले असेल ती पुस्तकें, " त्या परमुलकाचा कायद्याविषयी पुराव्यास सदरहु " प्रकारचा कोर्टानी व मनुष्यांनी कबूल करावी. " ( स० १८५५ चा आ० २ क० १२).

 ३२०. जा विवक्षित परमुलकी कायद्याविषयी सा. क्ष घेणे असेल, त्यांत ते निष्णात आहेत, असें अनुमान जा परमुलकी अम्मलदारांविषयी अथवा धंदा चालविणान्या वकिलांविषयी असेल, त्या कुशल साक्षींचा जबान्या घेऊन त्यांवरून परराज्यसंबंधी कायद्यांचा पुरावा करणे, हा अधिक चांगला मार्ग आहे. कारण, कोडताजवळ जी पुस्तके असतील त्यांवरून परमुलकी कायद्याचा अर्थ करितांना कोडताची चूक होण्याचे जोखम आहे हे उघड आहे.

 ३२१. जा एकाद्या व्यापाऱ्याने कोणा परमुलकांत धंदा चालविलेला असेल, आणि तो त्या कामांत कशल आहे असे मानण्या जोगा असेल, तर त्याची साक्ष घेऊन त्या परमुलकांतील व्यापारासंबंधी चालीविषयी शाबिती करितां येते.

 ३२२. अशा कुशल लोकांचा साक्षीविषयी जी मान्यता असत्ये ती निरनिराळ्या प्रकारची असत्ये, आणि तिजविषयी निर्णय करणे बहुधा कांहीसे अडचणीचे असते. अलीकडे डॉक्टर स्मेथर्स्ट एका बायकोस विष घालून याणे मारल्याबदलचा चौकशीत अतिशय नामांकित वैद्यही चुक्या करण्यास किती पात्र