पान:प्रमाणशास्त्र.pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१७०
अभिप्रायरूपी साक्ष.

ऐकण्या करितां एकादा पूर्वी सांगितल्या सारिखा विद्वान् कोर्टात बसला असल्यास, प्रत्येक वेळी त्याचसारिख्या स्वरूपाचा प्रश्न विचारिला पाहिजे; कारण, कोणत्याची शाबिती जाहली याचा निर्णय करणे हे त्याचे काम नाही, परंतु काही बाबत खरी आहे असे अनुमान करून, ती त्यासमूर आणून तिजविषयी त्याचा अभिप्राय विचारावा.

 ३१७. अशा कुशल साक्षीदारांस, त्यांचा शास्त्राविषयी किंवा कलेविषयीं जांत व्याख्या केलेली असत्ये, अशी पुस्तकें पाहून आपली आठवण ताजी करण्याची परवानगी मिळन्ये, असे दिसते.

 ३१८. "सार्वजनीन इतिहास, किंवा विद्या, " किंवा शास्त्र, किंवा कला, या विषयांचा बाबतीत, " प्रसिद्ध केलेले ग्रंथ, किंवा नकाशे, किंवा समुद्राचे " नकाशे, त्या त्या बाबतीत योग्य आधार आहेत, असे कोर्टाचा नजरेस येईल तर ते ग्रंथ, किंवा नकाशे, "किंवा समुद्राचे नकाशे, त्या त्या विषया प्रकरणी "पुराव्या करितां पाहण्याचा अधिकार सदरहु प्रकारचा सर्व कोर्टास आहे. " (सन १८५५ चा आक्ट २ कलम ११)

 ३१९." परमुलकाचा सरकारचा हुकुमावरून पुस्तके छापली असतील, किंवा प्रसिद्ध केली असताल, आणि त्या मुलकाचे स्टाट्यूट, किंवा कायदेपुस्तक, किंवा इतर लेखी कायदा, त्यांत आहे असे दर्शविले असेल ती पुस्तकें, आणि त्या मुलकांतील कोटचा निवाड्याचा रिपोरीची पुस्तके छापून प्रसिद्ध