पान:प्रमाणशास्त्र.pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अभिप्रायरूपी साक्ष

.

१६९

वैद्य अमुक प्रसंगी आबदारीने किंवा नीतीने वर्तला किंवा कसे, अशाविषयी आपला अभिप्राय देतां येत नाहीं; कारण की त्या गोष्टीचा निर्णय करणे पंचांचे काम असून, त्या गोष्टीचा निर्णयास विशेष कौशल्या. ची गरज नसत्ये.

 ३१५. “शास्त्रज्ञ साक्षीदारांचे अभिप्राय, त्या साक्षीदारांचा स्वतांचा अवलोकनावरून आणि त्यांचा "स्वतांचा माहितीतील गोष्टींवरून झालेले असल्यास "पुराव्यांत ग्राह्य होतात, आणि शिवाय अशा चौकशी. "समयी दुसऱ्या साक्षीदारांनी जो कजाचा पुरावा "केला असेल त्यावरूनही झालेले असले तरी ते ग्रास "होतात.”

 ३१६. त्याच प्रमाणे चौकशीसमयी इतर साक्षी दाराची साक्ष ज्या एकाद्या वैद्याने ऐकिली असेल, त्याजला, वैद्यकासंबंधी जा गोष्टीची शाबिती झाली असेल त्याविषयी आपली अभिप्रायरूपी साक्ष देता येत्ये; परंतु अशा बाबतीत त्या घडलेल्या गोष्टीवरून जांस व्यत्यय येतो, त्या गोष्टी तो पक्षकार कबूल करीत नसल्यास, त्या गोष्टी शाबीत आहेत किंवा नाहीत, असा प्रश्न त्या वैद्यांस करितां येणार नाही. कारण शाबितीनाशाबितीचा निर्णय करणे हे पंचांकडे आहे; परंतु अशा ठिकाणी "अमुक अमुक गोष्टी "खऱ्या आहेत अशी कल्पना केली असता, त्यांवरून तुम्ही काय अनुमान कराल ?” असा संदिग्ध प्रश्न त्या साक्षीदारास विचारावा; आणि साक्ष