पान:प्रमाणशास्त्र.pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१६८
अभिप्रायरूपी साक्ष.

 ३१२. याच प्रमाणे एका घर, किंवा कोडतांत आणितां येत नाही असा दस्तऐवज, अशां सारिखा जो एकादा मूर्तिमंत पुरावा प्रत्यक्ष हजर करितां येत नाही त्याचा स्वरूपाविषयी, किंवा त्याचा स्थितीविषयी आपला अभिप्राय देण्याचा साक्षीदारास अखल्यार आहे. तसेच लौकिकाविषयी, किंवा आब्रूविषयी साक्ष देणे, हे अभिप्रायरूपी साक्षीचे आणखी एक उदाहरण आहे.

 ३१३. में शास्त्र, किंवा जी कला, पुष्कळ सरावाने आणि अभ्यासाने, किंवा क्रियेने मात्र बराबर समजुतींत येतात, त्यांविषयींचा बाबतीत त्यांत जे मनुष्य कुशल असतात त्यांचा अभिप्राय घेण्याची वहिवाट आहे. याचप्रमाणे रोगाचा किंवा मरण्याचा कारगणाविषयीं, किंवा एकाद्या मनुष्याचा बुद्धीविषयीं, किंवा बुद्धिअंशाविषयी, वैद्याचा अभिप्राय पुष्कळ ठिकाणी घेण्यात येतो. आणि तसेंच टपालाकडील उसे, किंवा बिनहाशिली जाणाऱ्या लखोट्यांवरील सद्यांचा खरेपणाविषयी अभिप्राय देण्यास टपालाकडील अम्मलदारांस बलावितात; आणि इमारतीविषयी इंजनेर लोकांचा अभिप्राय घेतात; तसबिरीविषयी तसबीरकारांचा घेतात;आणि शिक्कयांवरील ठशांविषयी शिक्के खोदणारांचा;व नौकागमनाविषयी नाविकांचा, असे अभिप्राय घेण्यात येतात.

 ३१४ परंतु विवक्षित विषयांत ते कुशल असतील त्यासंबंधीच त्यांचा अभिप्राय असला पाहिजे; म्हणजे एकादा साक्षीदार वैद्य असेल, तर त्यास दुसरा,