पान:प्रमाणशास्त्र.pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अभिप्रायरूपी साक्ष.

१६७

त्याबाबद, किंवा एकाद्या स्त्रीस मुलगे झाले आहे किंवा नाही, या बाबद पैजा मारल्या असतील, त्यांविषयींचा कज्जांत असा मजकूर विचारूं देत नाहीत; आणि जेव्हां एकाद्या मुलाचा औरसपणाविषयी वाद पडला असतो, तेव्हां वरील कारणामुळेच त्याचा आईबापांचा संग झाला होता किंवा कसे, याविषयी त्यांजला विचारू देत नाहीत.


अभिप्रायरूपी साक्ष

 ३१०. स्वतांचा माहितीतील जा घडलेल्या गोटी असतील, त्यां विषयी मात्र साक्षीदाराने बोलावें; परंतु त्याच गोष्टींविषयी त्याणे आपला अभिप्राय देऊं नये, असा साधारण नियम आहे.

 ३११. परंतु कितीएक प्रश्न असे असतात, की त्यांमध्ये सहजच अभिप्रायरूप साक्ष गर्भित असत्ये; उदाहरण, मनुष्य, किंवा वस्तु, किंवा अक्षर, यांचा खरेपणाचा ओळखीविषयी प्रश्न. असे प्रश्न घातले असतां, साक्षीदारांस जबाबांत अभिप्राय किंवा भरवसा सांगू देणे, हे निखालस अवश्य आहे.

 याप्रमाणे बदकर्माचा कारणाने, किंवा लग्न करग्याचा करार तोडल्यामुळे नुकसानीचा फिर्यादीत साक्षीदाराने जी पक्षकाराची वर्तणूक पाहिली असेल, तिजवरून ती एकमेकांशी आसक्त होती किंवा कसे, याविषयी आपला अभिप्राय देण्याची त्याजला परवानगी मिळत्ये.