पान:प्रमाणशास्त्र.pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१६६
हक्काचे मजकूर.

तोंडचा मजकुरास आणि लेखी मजकुरास सारखा लागू आहे. परंतु एकाद्या अम्मलदारास एकाद्या बिनहुद्याचा मनुष्याने तो आपले सरकारी काम चालवीत नसतां सांगितलेली फिर्याद किंवा मजकूर हकाचा मानला जात नाही. (इ. स. १८५९ चा आक्ट ८ कलम १३८ ).

 ३०८. सन १८५५ चा २ या आक्टा चा २१ व्या कलमांत असे लिहिले आहे, की "राज्य प्रकरणाचा दस्तऐवजाचे हजर करणे सुनीतीचाविरुद्ध असेल तो राज्यप्रकरणाचा दस्तऐवज कोणी साक्षीदार पक्षकार असो किंवा नसो, त्यास हजर केलाच "पाहिजे, असे समजू नये; अथवा जा साक्षीदाराजवळ दुसऱ्या कोणा मनुष्याचा दस्तऐवज अमानत "असेल, आणि तो दस्तऐवज त्या दुसऱ्या मनुष्याचा "कबजांत असता तर त्या मनुष्यास तो हजर करावा "न लागता, तर तो दस्तऐवज त्या साक्षीदाराने हजर "केलाच पाहिजे असे समजू नये."

 कोणत्याही कारणावरून जे मजकूर हक्काचे असतील, त्यांस या वरील कलमाचा शेवटचा भाग लागू पडतो असे दिसते.

 ३०९. जो एकादा पुरावा फौजदारी किंवा दिवाणी न्यायास्तव अवश्य असेल, तो बीभत्सतेमुळे अग्राह्य असे कायदा ठरवीत नाही; परंतु विनाकारण आणि दुसऱ्याचे दिल दुखविण्या करितां पुरावा आणण्याची परवानगी कायदा देत नाही. उदाहरण, एकादें मनुष्य स्त्रीजाति आहे किंवा पुरुषजाति आहे