पान:प्रमाणशास्त्र.pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हक्काचे मजकूर.

१६५

योजिले त्यांची नावें, किंवा जांचा हातून आपणास बातमी कळली त्यांची नावे, किंवा गुन्ह्याविषयी आपण जांस बातमी दिली त्यांची नावें, उघड करण्याची परवानगी नाही. पोलिसाचा किंवा सरकारांचा मुखत्यारां प्रमाणे, किंवा हेरां प्रमाणे, जे मनुष्य योजिले असतात, त्यांचा बचाव होण्याचा विचार मनांत आणून हा नियम स्थापिला आहे; परंतु जिल्ह्यांतील कोडतांतून याचा मान कितपत राखतील, याविषयी संशय आहे. हा हक्काचा मजकुराचा चौथा प्रकार आहे.

 ३०७. राजनीतीचा कारणास्तव राज्याचा गुह्म गोष्टीही उघड करितां येत नाहीत, आणि या कारणावरून लंडनचा किल्ल्याचा एका अम्मलदारास चौकशीसमयीं त्या किल्ल्याचा नकाशा आणिला होता, तो खरा आहे किंवा कसे याविषयी प्रश्न करण्याची परवानगी दिली नाही. आणि याच प्रमाणे एकाद्या कालनीचा (म्हणजे नवीन वसविलेल्या देशाचा ) गव्हर्नर आणि त्याचा आटर्नी जनरल यांचा दरम्यानचे मजकूर, किंवा कालनीचा गव्हरनराचा आणि याचा अखत्यारांतील लश्करी अम्मलदारांचा दरम्याको मजकर हक्काचे आहेत असे मानले आहे; आणि याच प्रमाणे, सरकारी मनुष्यांचा दरम्यानचे आणखी पुष्कळ जातीचे सरकारी मजकूर हक्काचे मानले आहेत. आणि याच राज्यनीतीवरून अशा दस्तऐवजांतील मजकराविषयीं गौण पुरावा मान्य करण्याची सहजच मनाई केली गेली आहे; आणि हा नियम