पान:प्रमाणशास्त्र.pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१६४
हक्काचे मजकूर.

आणि ट्रस्टी किंवा गहाणदार याजपाशी विश्वासान ठेविलेल्या पदार्थाचा किंवा गहाणाचा मालकी विषयीचे दस्तऐवज आणण्यास, किंवा त्या दस्तऐवजांतील मजकुराचा गौण पुरावा देण्यास, त्याजवर सक्ती करितां येत नाही असे दिसते.

 ३०४. हा हक्क एक वेळ उत्पन्न झाला असतां अशिलाचा आणि वकिलाचा दरम्यानचा संबंध तुटला तरी सरत नाही; परंतु त्या अशिलाने किंवा त्याचा वारसाने तो दूर केला नसल्यास त्या अशिलाचा मरणा नंतरही तो तसाच राहतो. अशिल मरण पावल्या नंतर जे कज्जे उत्पन्न होतात आणि जांत दोन पक्षकारांचा वाद असून प्रत्येक पक्षकार मूळ अशि लाचा वारस असल्याविषयी दावा करितो, त्या कजास हा नियम लागू नाही.

 ३०५. न्यायाधीशांचा समोर चौकशी चालत असतां जो मजकूर झाला असेल, त्याविषयीची साक्ष देण्यास त्यांजला आणता येत नाही. जा ठिकाणी कपट किंवा तर्कट झाले असे म्हणणे असेल, तो कज्जा खेरीज करून पंचांनी किंवा जूरीवाल्यांनी कोणत्या आधारावरून निवाडा केला, याविषयी त्यांजला विचारपूस करितां येत नाही; तथापि तो हक्क सोडून देण्याचा त्यांजला अखत्यार आहे. हा हक्काचा मजकूराचा तिसरा प्रकार होय.

 ३०६. सरकार तरफेर्ने फौजदारी खटला चाल. त असतां त्यांतील सरकार तरफेचे साक्षीदार यांजला प्रतिप्रश्न होत असतां, आपणास जांणी कार्यास